IPL 2023: चेन्नई सुपर किंग्सचा सनरायझर्स हैदराबादवर सात विकेट्सने विजय

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

आयपीएल 2023 च्या 29 व्या सामन्यात चेन्नई सुपर किंग्सने (CSK) सनरायझर्स हैदराबादचा (SRH) 7 विकेट्सने पराभव केला. या विजयासह चेन्नईचे 8 गुण झाले असून गुणतालिकेत ते तिसऱ्या स्थानावर कायम आहेत. प्रथम फलंदाजी करणाऱ्या सनरायझर्स हैदराबादला सात विकेट्सवर केवळ 134 धावा करता आल्या. प्रत्युत्तरात चेन्नई सुपर किंग्जने डेव्हॉन कॉनवेच्या अर्धशतकाच्या बळावर 7 चेंडू राखून सामना जिंकला. चेन्नईकडून सलामीवीर डेव्हॉन कॉनवेने सर्वाधिक 77 धावा केल्या व तो नाबाद राहिला.

सनरायझर्स हैदराबादने दिलेल्या 135 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना चेन्नई सुपर किंग्सची सुरुवात चांगली झाली. ऋतुराज गायकवाड आणि डेव्हॉन कॉनवे यांनी पॉवरप्लेमध्येच 60 धावा केल्या. दोघांमध्ये पहिल्या विकेटसाठी 66 चेंडूत 87 धावांची भागीदारी झाली. ऋतुराज गायकवाड 30 चेंडूत 35 धावा करून धावबाद झाला. अजिंक्य रहाणेने 9 धावांचे योगदान दिले. अंबाती 9 धावा करून बाद झाला. यानंतर अली आणि कॉनवे यांनी 16 धावांची भागीदारी करून संघाला विजय मिळवून दिला. डेव्हॉन कॉनवे 57 चेंडूत 77 धावा करून नाबाद राहिला. त्याने आपल्या खेळीत 12 चौकार आणि 1 षटकार लगावला.

चेन्नई सुपर किंग्जविरुद्धच्या सामन्यात सनरायझर्स हैदराबादने प्रथम फलंदाजी करताना 20 षटकांत 7 गडी गमावून 134 धावा केल्या. हैदराबादकडून अभिषेक शर्माने सर्वाधिक 34 धावा केल्या. चेन्नई सुपर किंग्जकडून रवींद्र जडेजाने 3, महिश, आकाश आणि पाथिरानाने 1-1 बळी घेतला. प्रथम फलंदाजी करताना सनरायझर्स हैदराबादची सुरुवात चांगली झाली. संघाने पहिल्या 4 षटकात 34 धावा केल्या. पण हॅरी ब्रूक 5व्या षटकात 18 धावा काढून बाद झाला. अभिषेक 26 चेंडूत 34 धावा करून बाद झाला. यानंतर हैदराबादने ठराविक अंतराने विकेट्स राखल्या. राहुल त्रिपाठी 21, कर्णधार एडन मार्करामने 12 धावांचे योगदान दिले. हेन्रिक क्लासेन 17 धावा करून बाद झाला. मयंक अग्रवाल केवळ दोन धावा करू शकला. वॉशिंग्टन सुंदरने 9 धावा केल्या. तर मार्को जॅनसेन 17 धावांवर नाबाद राहिला.