कोरोना लसीकरणाचा त्रास झाल्यास विमाधारकाला उपचार खर्च द्यावा लागेल

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

विमा कंपनीचे प्रीमियम भरणाऱया व्यक्तीने कोरोना प्रतिबंधक लसीचा डोस घेतल्यावर त्याला त्रास झाला तर त्याच्या उपचाराचा खर्च विमा कंपनीला नाकारता येणार नाही, असे फर्मान हिंदुस्थानी विमा नियामक मंडळ आणि विकास प्राधिकरणाने (आयआरडीएआय) काढले आहे. त्यामुळे कोरोना लस घेतल्यावर विमाधारकाला साईडइफेक्ट झाल्यास त्याचा उपचार अथवा कॅशलेस उपचार विमा कंपनीला करावाच लागणार आहे.

कोरोना प्रतिबंधक लसीकरणानंतर काही समस्या आल्या तर अशा विमाधारकाचा रुग्णालयातील उपचारांचा खर्च विम्यात सामील असेल का, अशी शंका सर्वसामान्यांच्या मनात घर करून आहे. या शंकेचे निरसन करीत आयआरडीएआयने विमा कंपन्यांना अशा उपचारासाठीचा खर्च विमाधारकाला द्यावाच लागेल असे बजावले आहे. त्यासाठी आरोग्य विम्यात विमा कंपनीने जे नियम आणि अटी सांगितल्या असतील त्याचे पालन करावेच लागेल, असे विमा नियामक प्राधिकरणाने गुरुवारी स्पष्ट केले आहे.