दारु ठरणार स्वादुपिंडाच्या कर्करोगावर रामबाण उपाय

आज कितीही वैद्यकीय तंत्रज्ञान पुढे गेले असले तरीही कर्करोग या चार अक्षरांचा सामान्य माणूस धसकाच घेतो. कोणत्याही प्रकारच्या कर्करोगाचे वेळीच निदान नाही झाले आणि तो वाढत गेला तर रुग्ण 10 वर्षां पेक्षा अधिक काळ काढू शकत नाही. रोगाचे निदान झाल्यानंतर केवळ पाच टक्के लोक एक दशकापेक्षा जास्त काळ जगतात. पण नुकत्याच केल्या गेलेल्या अभ्यासानुसार, Isolquiritigenin (ISL) अर्थात लिकोरिस या मद्यातील एक संयुग – स्वादुपिंडाच्या कर्करोगाशी लढा देण्यासाठी प्रभावी असल्याचे सिद्ध झाले आहे.

हाँगकाँगमधील बॅप्टिस्ट विद्यापीठाच्या एका नवीन अभ्यासात हे आढळून आले आहे. संशोधकांनी असा दावा केला आहे की, लिकोरिसमधील संयुगाचा उंदरांवर प्रयोग करून पाहिल्यास असे आढळून आले की ट्यूमरवर 30 मिलिग्रॅम आयएसएल संयुग वापरल्याने ट्युमरचा आकार कमी झाला.

विद्यापीठाच्या स्कूल ऑफ चायनीज मेडिसिनचे प्राध्यापक जोशुआ को का-शून म्हणाले की “केमोथेरपी उपचारांमध्ये पुढील विकासासाठी हे कंपाऊंड विचारात घेण्यासारखे आहे. “आयएसएलमध्ये स्वादुपिंडाच्या कर्करोगाच्या वाढीला प्रतिबंधित करण्याचा प्रमुख गुणधर्म आहे, ही एक नैसर्गिक प्रक्रिया आहे जिथे शरीराच्या पेशी खराब झालेले किंवा अनावश्यक घटक साफ करतात. को का-शून आता स्वादुपिंडाच्या कर्करोगाच्या रूग्णांच्या चाचण्या करण्यासाठी युरोप आणि चीनमधील वैद्यकीय क्षेत्रातून सहकार्य मिळण्याच्या प्रतीक्षेत आहेत.

दारूचा कर्करोगावर होणाऱ्या परिणामावर सध्या संशोध सुरू आहे. त्यामुळे शास्त्रज्ञांनी लोकांना कमी दारू पिण्याचाच सल्ला दिला आहे.