प्रभासच्या ‘कल्की’ला आता जूनचा मुहूर्त

साऊथ सुपरस्टार प्रभास आणि दीपिका पादुकोण यांचा सायन्स-फिक्शन चित्रपट ‘कल्की 2898 एडी’ची घोषणा झाल्यापासून प्रेक्षकांमध्ये या चित्रपटाची प्रचंड क्रेझ निर्माण झाली आहे. दीर्घ प्रतिक्षेनंतर हा चित्रपट यावर्षी 9 मे रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित होण्यासाठी सज्ज झाला होता. मात्र, आता या चित्रपटाविषयी नवीन अपडेट समोर आली आहे. या चित्रपटाच्या रिलीजची तारीख पुन्हा बदलण्यात आली आहे. आता हा चित्रपट 27 जून रोजी प्रदर्शित होणार आहे. निर्मात्यांनी या चित्रपटाचे नवीन पोस्टर शेअर करत ही बातमी दिली आहे.