ट्रम्प आणि स्टॉर्मी आमनेसामने

अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर एका पॉर्न स्टारला पैसे देऊन गप्प बसण्यास सांगितल्याचा आरोप आहे. याप्रकरणी अमेरिकन कोर्टात सुनावणी झाली. या सुनावणीत पॉर्न स्टार स्टॉर्मी डॅनिएलने ट्रम्पविरोधात साक्ष दिली आहे. ट्रम्प यांच्यावर 2016 च्या राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीपूर्वी स्टॉर्मीला गप्प राहण्यासाठी पैसे दिल्याचा आरोप आहे. ट्रम्प यांच्या वतीने 1 लाख 30 हजार डॉलर्स पॉर्न स्टारला दिले होते, असे ट्रम्पच्या वकिलांनीही कबूल केले होते.