75 हजार वर्षांपूर्वीचा महिलेचा चेहरा तयार!

 

ब्रिटनमधील पुरातत्त्व तज्ञांच्या पथकाने 75 हजार वर्षांपूर्वीच्या ‘निएंडरथल’ महिलेचा चेहरा तयार केला आहे. या महिलेचा चेहरा कवटी वापरून तयार करण्यात आला आहे. ही कवटी 2018 मध्ये सापडली होती; परंतु ती खराब अवस्थेत होती. तरीसुद्धा शास्त्रज्ञांनी हे करून दाखवले आहे. शास्त्रज्ञांनी केलेल्या प्रयत्नांना यश मिळाले आहे. या महिलेचे नाव शनिदर झेड आहे. कारण तिची कवटी इराकमधील कुर्दिस्तानमधील एका गुहेत सापडली होती. या शोधातून 40 हून अधिक निएंडरथल स्त्रियांबद्दलदेखील माहिती झाली आहे. हा चेहरा उरलेल्या सांगाडय़ाचा वापर करून तयार करण्यात आला आहे. या सांगाडय़ाची हाडे ओल्या बिस्किटासारखी नाजूक झाल्याचेही अहवालात म्हटले आहे. सांगाडय़ाच्या नाजूक परिस्थितीमुळे हा चेहरा तयार करणे हे तज्ञांसाठी मोठे आव्हान होते.