Jyothi Rai Private Video Leaked – प्रसिद्ध अभिनेत्रीचे प्रायव्हेट व्हिडीओ लीक, चाहत्यांचा संताप

सोशल मीडियाच्या जमान्यात सेलिब्रिटींचे प्रायव्हेट फोटो आणि व्हिडीओ लीक होण्याचे प्रमाण वाढले आहे. हग गंभीर मुद्दा बनला असून यालाच आता कन्नड अभिनेत्री ज्योती रायही बळी पडली आहे. दक्षिणेकडील प्रसिद्ध अभिनेत्री ज्योती राय हिचे प्रायव्हेट व्हिडीओ आणि फोटो सोशल मीडियावर लीक झाले आहेत. त्यामुळे चाहत्यांमध्ये संतापाचे वातावरण असून याप्रकरणी कायदेशीर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे.

‘हिंदुस्थान टाइम्स’ने दिलेल्या वृत्तानुसार, एका युजरने अभिनेत्री ज्योती राय हिचे प्रायव्हेट व्हिडीओ आणि फोटो सोशल मीडियावर व्हायरल केले आहेत. तसेच हे व्हिडीओ युट्यूबवरही अपलोड करण्याची धमकी दिली. एका प्रसिद्ध अभिनेत्रीचे प्रायव्हेट व्हिडीओ व्हायरल करण्यात आल्याने चाहत्यांनी संताप व्यक्त केला आहे. नेटकऱ्यांनी बंगळुरू पोलिसांना टॅग करत संबंधितावर कारवाई करण्याची मागणी केली आहे.

कोण आहे ज्योती राय?

ज्योती राय कन्नड चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री आहे. मोठ्या पडद्यावरून कारकिर्दीला सुरुवात केलेल्या ज्योतीने त्यानंतर आपला मोर्चा छोट्या पडद्याकडे वळवला. आतापर्यंत तिने 20हून अधिक मालिका आणि शोमध्ये काम केले आहे. सध्या ती ‘गुपेदंता मानुसू’ या मालिकेत झळकत आहे.

दरम्यान, ज्योती सोशल मीडियावरही कायम सक्रिय असते. आपले सुंदर फोटो आणि व्हिडीओ ती कायम सोशल मीडियावर शेअर करत असते. इन्स्टाग्रामवर तिचे 4 लाख 65 हजारांहून अधिक फॉलोअर्स आहेत. तरुण दिग्दर्शक सुकू पुर्वजसोबत ती रिलेशनशिपमध्ये असून दोघांनी यास दुजोराही दिलेला आहे. त्यांनी साखरपुडाही उरकून घेतला असून लवकरच लग्नही करणार आहेत.

ज्योती हिचे हे दुसरे लग्न असणार आहे. याआदी 20 वर्षांची असताना तिचे पद्मनभासोबत लग्न झाले होते. दोघांना एक मुलगाही असून तो 11 वर्षांचा झाला आहे. मात्र नंतर तिने घटस्फोट घेतला आणि सध्या ती सुकू पुर्वजसोबत रिलेशनशिपमध्ये आहे. दोघे लवकरच लग्न करणार आहेत.