
सामना प्रतिनिधी । मुंबई
जन्मोजन्मी हाच पती लाभू दे आणि पतीला उदंड आयुष्य मिळावे यासाठी बुधवारी साजऱ्या होणाऱ्या वटपौर्णिमेनिमित्त सौभाग्यवतींकडून वाण वाहण्यात येते. यात फणसाचे गरे असतात. त्या पार्श्वभूमीवर, राज्यभरातून मुंबईत फणस विक्रीला आणले जात आहेत.































































