शिवरायांचा अवमान करणाऱ्या राज्यपालांविरोधात जालन्यात कडकडीत बंद

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी व भाजपचे राष्ट्रीय प्रवक्ते सुधांशू त्रिवेदी यांनी छत्रपती शिवाजी महाराज तसेच महात्मा फुले व सावित्रीबाई फुले यांच्याविषयी केलेल्या अवमानकारक वक्तव्याच्या निषेधार्थ बुधवार, 7 डिसेंबर रोजी मराठा क्रांती मोर्चा व समविचारी पक्षाच्या वतीने पुकारण्यात आलेल्या जालना जिल्हा बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.

दरम्यान, राज्यपालांनी केलेल्या अवमानकारक वक्तव्याच्या निषेधार्थ जालना शहरातून सर्व पक्षीय रॅली काढण्यात आली. जालना तालुक्यासह अंबड, घनसावंगी, मंठा, परतूर, जाफराबाद, भोकरदन, बदनापूर तालुक्यांतही शाळा व अत्यावश्यक सेवा वगळता सर्वच बाजारपेठ बंद होत्या. आज सकाळपासून मुख्य बाजारपेठेत व्यापाऱयांनी स्वयंस्फुर्तीने आपले व्यापार बंद ठेवले होते. या बंदमध्ये मराठा क्रांती मोर्चा, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे), काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, बसपा, शेतकरी संघटना, वंचित बहुजन आघाडी, जयभीम सेना व विविध सामाजिक संघटना सहभागी झाल्या होत्या.

राज्यपाल, भाजपच्या विरोधात निषेध रॅली

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी व भाजपचे राष्ट्रीय प्रवक्ते सुधांशू त्रिवेदी यांनी छत्रपती शिवाजी महाराज तसेच महात्मा फुले व सावित्रीबाई फुले यांच्याविषयी केलेल्या अवमानकारक वक्तव्याच्या निषेधार्थ पुकारण्यात आलेल्या जालना बंदचा एक भाग म्हणून जालना शहरातून निषेध रॅली काढण्यात आली. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळय़ापासून निघालेली रॅली महात्मा गांधी पुतळा येथे विसर्जित झाली.

13 डिसेंबरला ‘पुणे बंद’
शिवरायांबद्दल अवमानकारक वक्तव्य करणारे, तसेच महापुरुषांचा अवमान करणारे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना पदावरून हटवावे, या मागणीसाठी मंगळवारी 13 डिसेंबर रोजी ‘पुणे बंद’ची हाक देण्यात आली आहे. पुण्यातील शिवप्रेमी आणि राज्यातील विरोधी पक्ष व विविध संघटनांच्या बैठकीत हा निर्णय झाला.