
जालना शहरातील चंदनझिरा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक रामेश्वर खनाळ यांना शनिवारी सकाळी चंदनझिरा भागातील लहुजीनगर वस्तीत राहणार्या एका सराईत गुन्हेगाराकडे धारदार तलवारी असल्याची माहिती गोपनीय सूत्राकडून मिळाली होती. त्या माहितीनुसार पोलीस निरीक्षक खनाळ यांनी पोलिसांच्या ताफ्यासह लहुजी नगर येथे रवी त्रिंबक जाधव यांच्या घरावर धाड टाकली. त्याच्या घराची झाडाझडती घेतली असता घरामध्ये कापडाच्या म्यानमध्ये ठेवलेल्या दोन धारदार तलवारी आढळून आल्या आहेत. याप्रकरणी सहायक फौजदार प्रवीण कांबळे यांच्या फिर्यादीवरून भारतीय हत्यार बंदी कायद्यानुसार रवी जाधव याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करून अटक त्यास अटक करण्यात आली आहे.
सदर कारवाई पोलीस अधीक्षक डॉ. अक्षय शिंदे, अप्पर पोलीस अधीक्षक राहुल खाडे, उपविभागीय पोलीस अधिकारी नीरज राजगुरू यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक रामेश्वर खनाळ, सहायक पोलीस निरीक्षक चैनसिंग गुसिंगे, पोलीस उपनिरीक्षक विठ्ठल शिंदे, शिवाजी पोहार, गणेश झलवार यांच्यासह पोलीस कर्मचारी राजेंद्र पवार, राहुल काकरवाल, साई पवार, देशमुख, चंद्रकांत माळी आदींनी पार पाडली आहे.






























































