ज्वेलर्स शॉपचे शटर उचकटून सोन्या-चांदीचे दागिने लंपास

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । जामखेड

जामखेड तालुक्यातील जवळा येथील वरदलक्ष्मी ज्वेलर्स या सोन्याचे दुकानाचे शटर तोडून अज्ञात पाच ते सहा चोरट्यांनी सोने, चांदी व रोख रक्कमेसह पावणेदोन लाखांचा ऐवज लंपास केला. या प्रकरणी दुकानाचे मालक शिवानंद सुभाष कथले (35) यांच्या फिर्यादीवरून पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

बुधवारी रात्री नऊच्या सुमारास शिवानंद दुकान बंद करून गेले. यानंतर मध्यरात्री पाच ते सहा चोरट्यांनी शटर उचकटून आत प्रवेश केला आणि सोन्या-चांदीचे दागिने व रोख 12 हजार असा 1 लाख 73 हजार रुपयांचा ऐवज लंपास केला. सकाळी ही घटना लक्षात आली असता दुकान मालकांनी तडक पोलीस स्थानक गाठत फिर्याद दिली. ही चोरी सीसीटीव्हीमध्यै कैद झाली आहे. परंतु सीसीटीव्ही कॅमेर्‍यात सहा चोरटे दिसत असतानाही पोलिसांनी एकच चोर असल्याचे दाखवले आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक पांडुरंग पवार यांच्या मार्गदर्शनाखाली विठ्ठल चव्हाण हे करत आहेत.