
जम्मू-कश्मीरच्या कुपवाडा जिल्ह्यात सीमारी रोडवर सोमवारी पहाटे स्कॉर्पिओ कार नदीत कोसळली. या अपघातात पाच जणांचा मृत्यू झाला असून सहा जण जखमी झाले आहेत. मृतांमध्ये नऊ महिन्यांच्या मुलीचाही समावेश आहे. जखमींना उपचारासाठी कुपवाडा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
जागरणने दिलेल्या वृत्तानुसार, तीव्र वळणावर स्कॉर्पिओ गाडीवरील नियंत्रण सुटले आणि ती किशनगंगा नदीत कोसळली. अपघाताची माहिती मिळताच, स्थानिक रहिवासी, पोलीस आणि सुरक्षा दल घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांनी बचावकार्य सुरू केले. इद्रिस दिन (32), नऊ महिन्यांची हमजा, सैदा बेगम (28), शब्बीर अहमद (50) आणि राजा (30) अशी मयतांची नावे आहेत. जखमींची प्रकृती गंभीर असल्याने त्यांना हंदवारा येथील रुग्णालयात पाठवण्यात आले आहे.



























































