TMC च्या नाव आणि चिन्हाच्या वादावर ३ महिन्यांत निर्णय घ्या; सर्वोच्च न्यायालयाचे निवडणूक आयोगाला निर्देश

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

तृणमूल काँग्रेस (TMC) पक्षाचे नाव आणि गवत आणि फुले या निवडणूक चिन्हाच्या वादावर येत्या ३ महिन्यांत अंतिम निर्णय घेण्याचे महत्त्वपूर्ण निर्देश सर्वोच्च न्यायालयाने निवडणूक आयोगाला दिले आहेत. या प्रकरणातील सर्व पक्षकारांना आपापला युक्तिवाद आणि कागदपत्रे सादर करण्यासाठी न्यायालयाने चार आठवड्यांची मुदत दिली आहे.

सोमवारी सर्वोच्च न्यायालयात टीएमसीच्या नाव आणि निवडणूक चिन्हाबाबतच्या वादावर सुनावणी पार पडली. यावेळी न्यायालयाने स्पष्ट केले की, तृणमूल काँग्रेसच्या नाव आणि गवत व फुले या निवडणूक चिन्हावरून सुरू असलेल्या वादावर तोडगा काढण्यासाठी निवडणूक आयोगाकडे “तीन महिन्यांचा कालावधी पुरेसा आहे”.

सर्वांत महत्त्वाची बाब म्हणजे, ही तीन महिन्यांची मुदत लगेच सुरू होणार नसून ती चार आठवड्यांनंतर सुरू होईल, असे न्यायालयाने स्पष्ट केले आहे. सर्वोच्च न्यायालयाने या प्रकरणातील सर्व संबंधित पक्षांना आपली बाजू, युक्तिवाद आणि आवश्यक कागदपत्रे सादर करण्यासाठी एक महिन्याचा (चार आठवड्यांचा) वेळ दिला आहे. ही प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर, पुढील तीन महिन्यांच्या आत निवडणूक आयोगाला यावर अंतिम निर्णय घ्यावा लागेल.