
जवाहरलाल नेहरू विद्यापीठातील (जेएनयू) दहशतवादी कारवाया रोखण्यासाठी राष्ट्रीय सुरक्षा अभ्यास केंद्राची (सीएनएसएस) स्थापना करण्यात आली आहे. या केंद्रात राष्ट्राच्या सुरक्षेसाठी धोकादायक बनलेल्या सर्व प्रकारच्या दहशतवादावर डॉक्टरेट दर्जाचे संशोधन होणार आहे. त्यासाठी तज्ञांची टीम बनवण्यात आली असून ती दहशतवादविरोधी धोरण तयार करण्याबरोबरच राष्ट्रविरोधी कारवाया आणि विचारसरणीही ठेचून काढण्यासाठी कार्यवाही करणार आहे. या केंद्राचे काम कोणत्याही हस्तक्षेपाशिवाय स्वतंत्रपणे चालणार आहे.
डाव्या विचारसरणीच्या काही विद्यार्थ्यांनी 9 फेब्रुवारी 2016 रोजी जेएनयूमध्ये राष्ट्रविरोधी घोषणा दिल्या होत्या. त्या घटनेपासून आतापर्यंत जेएनयूमध्ये बरेच बदल झाले आहेत. सीएनएसएसच्या माध्यमातून जेएनयूमध्ये राष्ट्रप्रेमी तज्ञ घडवले जाणार आहेत. हेच तज्ञ भविष्यात देशाच्या सुरक्षा धोरणात महत्त्वाची भूमिका बजावू शकतील, असा विश्वास केंद्राचे प्रमुख प्रा. अजय दुबे यांनी व्यक्त केला आहे.
या विषयांवर होणार संशोधन
– सीमेपलीकडून प्रोत्साहित दहशतवाद
– राज्यांमधील दहशतवाद
– जैविक शस्त्र्ाs
– दहशतवाद भडकावण्यासाठी वापरली जाणारी सोशल मीडियासारखी माध्यमे
– सायबर क्राइम
– देशाची अंतर्गत सुरक्षा
– दहशतवादासाठी तंत्रज्ञानाचा वापर

























































