‘जम्बो’तील रुग्णांवर 35 तज्ञ डॉक्टरांची नजर, कोरोना रुग्णांना मिळणार अधिक प्रभावी उपचार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मुंबईतील जम्बो कोरोना केंद्रांतील रुग्णांना अधिक प्रभावी उपचार मिळावेत, यासाठी मुंबई महानगरपालिकेने या कोरोना केंद्रांवर 35 खासगी तज्ञ डॉक्टरांची सेवा सल्लागार म्हणून नियुक्ती केली आहे. हे तज्ञ डॉक्टर्स फोनद्वारे भायखळा, बीकेसी, एनएससीआय, नेस्को, मुलुंड आणि दहिसरमधील केंद्रांमध्ये सेवा देणार असून आवश्यकतेनुसार प्रत्यक्ष कोरोना केंद्रांना भेट देऊन तेथील डॉक्टरांशी उपचारांबाबत सल्लामसलत करणार आहेत.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर, मुंबई महानगरपालिका आरोग्य यंत्रणेला अधिक सक्षम करण्याचे धोरण अवलंबत आहे. त्यामुळे जम्बो कोरोना रुग्णांवर अधिक प्रभावी उपचार व्हावेत, यासाठी शहरातील 11 खासगी रुग्णालयांतील 35 तज्ञ डॉक्टरांचा सल्ला फोनद्वारे घेतला जाणार आहे. त्याचबरोबर यात केईएम, नायर, शीव या प्रमुख रुग्णालयांतील तज्ञ डॉक्टारांसह परिचारिका, तंत्रज्ञ, वॉर्डबॉय यांचाही समावेश करण्यात येणार आहे. सध्या या ठिकाणी सुमारे 7 हजार 650 बेड उपलब्ध असून 1 हजार 466 वैद्यकीय कर्मचारी कार्यरत आहेत. या केंद्रांमध्ये गरजेनुसार वैद्यकीय कर्मचार्यांची संख्याही वाढवण्यात येणार आहे. आतापर्यंत सर्व जम्बो कोरोना केंद्रांत मिळून 20 हजार 722 रुग्णांवर उपचार करण्यात आले आहेत, अशी माहिती महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांनी दिली.

– ‘ई’ विभागात येणार्या भायखळा जम्बो कोविड सेंटरमध्ये जसलोकमधील 2 तर भाटिया रुग्णालयातील 3 असे एकूण 5 डॉक्टर्स z ‘जी/दक्षिण’ विभागात येणार्या वरळी, प्रभादेवीतील एनएससीआयमधील सेंटरमध्ये बॉम्बे व ब्रिच कॅन्डीचे 8 डॉक्टर्स z ‘एच/पूर्व’ विभागात येणार्या बीकेसीतील सेंटरमध्ये लीलावती व हिंदुजा रुग्णालयाचे 7 डॉक्टर्स z ‘पी/दक्षिण’ विभागात येणार्या गोरेगाव नेस्को कोराना सेंटरमध्ये नानावटी व अंबानी रुग्णालयाचे 6 डॉक्टर्स
– ‘टी’ विभागात येणार्या मुलुंड परिसरातील सेंटरमध्ये फोर्टीस रुग्णालयाचे एक डॉक्टर z ‘आर/उत्तर’ विभागात येणार्या दहिसर परिसरातील सेंटरमध्ये बॉम्बे व सुराणा रुग्णालयाचे 8 डॉक्टर्स.