ओशिवऱ्यात कपिल शर्माच्या फ्लॅटला आग

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी, मुंबई

हास्य अभिनेता कपिल शर्मा याच्या अंधेरी ओशिवरातील फ्लॅटमध्ये आग लागल्याची घटना आज घडली. सुदैवाने अग्निशमन दलाने आगीची माहिती मिळताच तातडीने धाव घेत आगीवर नियंत्रण मिळवले. या आगीत उमेश सुरवाडे (30) जखमी झाले असून त्यांच्यावर कुपर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

ओशिवऱ्यात ग्रीन पार्कजवळील ‘शांतीवन’ या सातमजली ‘म्हाडा’च्या इमारतीत चौथ्या मजल्यावर कपिल शर्माचा हा प्लॅट आहे. या फ्लॅटमध्ये दुपारी 3 वाजण्याच्या सुमारास आग लागली. ‘झीरो’ लेव्हलची ही आग अग्निशमन दलाने अर्ध्या तासातच विझवली. दोन फायर इंजिन, 2 वॉटर टँकरच्या सहाय्याने या आगीवर नियंत्रण मिळवण्यात आले.