
सामना ऑनलाईन । बंगळुरू
हिंदुस्थानमध्ये 100 हून अधिक शहरांमध्ये कॅबे सेवा देणार्या ओला कंपनीला कर्नाटक सरकारने मोठा दिलासा दिला आहे. ओला कंपनीवर सहा महिन्यांसाठी घातलेली बंदी राज्य सरकारने रद्द केली आहे. काही दिवसांपूर्वी नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी ओला कंपनीवर कर्नाटक सरकारने सहा महिन्यांची बंदी घातली होती. ओलाकडे राज्यात फक्त चारचाकी गाडींचा परवाना होता. परंतु कंपनीने राज्य सरकारची परवानगी न घेता दुचाकींचीही सेवा सुरू केली होती. त्यामुळे परिवहन विभागाने सहा महिन्यांसाठी ओलावर बंदी घातली होती.
ओलावरची बंदी हटवल्याची माहिती कर्नाटकचे समाज कल्याण मंत्री प्रियांक खर्गे यांनी ट्विटरवरून दिली आहे. खर्गे म्हणाले की, ‘ओला कॅब्स आजपासून आपली सेवा सुरु करू शकते. तसेच कंपनीने नवी तंत्रज्ञानाशी जुळवून घेण्यासाठी नवे धोरण आखावे व उद्योग्यांनी सरकारशी सहकार्य करून विकासासाठी मदत करावी.”
. @Olacabs will run their business as usual from today. However there is an urgent need for policies to catch-up with new technologies & also industries too should work closer with Govt to help evolve policies for innovations.
— Priyank Kharge (@PriyankKharge) March 24, 2019
























































