
जगातील पहिल्या क्रमांकाचा प्रीमियम मोटरसायकल ब्रॅण्ड असलेल्या केटीएमने हिंदुस्थानात दहाव्या वर्षात पदार्पण केले आहे. केटीएम रेंजने 2012 साली दोन मॉडेलच्या सहाय्याने हिंदुस्थानात पाऊल ठेवले होते. त्यानंतरच्या नऊ वर्षांत कंपनीने यशस्वी घोडदौड सुरू ठेवत आता 11 मॉडेल्सपर्यंत मजल मारली आहे.
कंपनीने परफॉर्मन्स, टेक्नॉलॉजी, डिझाईन, फिचर्स याबाबतीत तरुणाईच्या पसंतीचा विचार केला आहे. कंपनी हिंदुस्थानातील सेवेचे दहावे वर्षे साजरे करीत असून ग्राहकांसाठी विविध सुविधांची घोषणा केली आहे.


























































