
सामना ऑनलाईन । सोनभद्र
उत्तर प्रदेशमधील सोनभद्र जिल्ह्यातील उभभा गावात जमिनीच्या क्षुल्लक वादातून तुफान राडा झाला. सरपंच आणि गावकऱ्यांमध्ये झालेल्या भांडणात गोळीबार झाला आणि यात 9 लोकांचा मृत्यू झाला, तर 16 जण गंभीर जखमी झाले आहेत. मृतांमध्ये पाच पुरूष आणि चार महिलांचा समावेश आहे. सरपंचाच्या माणसाने गावकऱ्यांवर गोळीबाराचा आदेश दिल्याचा आरोप करण्यात आला असून मृतांचा आकडा आणखी वाढण्याची भीती व्यक्त करण्यात आली आहे.
Sonbhadra: Casualties reported after firing between two groups over a land dispute in Ghorawal today; District Magistrate Ankit Kumar Agarwal says, “We can’t tell exact numbers as of now. 9 persons brought to District Hospital. Some are injured & some are dead.” pic.twitter.com/QDeL1QylFK
— ANI UP (@ANINewsUP) July 17, 2019
मिळालेल्या माहितीनुसार, उभभा गावच्या सरपंचाने 2 वर्षांपूर्वी जवळपास 18 एकर जमीन खरेदी केली होती. बुधवारी सरपंच आपल्या पाठिराख्यांसह जमिनीचा ताबा घेण्यासाठी पोहोचला. यावेळी गावकऱ्यांनी याला प्रचंड विरोध केला. यानंतर सरपंचाच्या गुंडांनी तुफान गोळीबार सुरू केला. यात 9 गावकऱ्यांचा मृत्यू झाला, तर 16 गंभीर जखमी झाले आहेत. जखमींवर स्थानिक रुग्णालयात उपचार सुरू आहेत. घटनेची माहिती मिळताच स्थानिक पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली असून दोघांना अटक केली आहे. तणावाचे वातावरण पाहता गावात सध्या मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला आहे.
मुख्यमंत्र्यांनी दिले चौकशीचे आदेश
यूपीचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी घटनेची माहिती घेतली असून चौकशीचे आदेश दिले आहेत. जखमींना तात्काळ मेडिकल सुविधा पुरवण्याचे आदेश योगींनी जिल्हाधिकाऱ्यांना आणि अधिकाऱ्यांना दिले आहेत. तसेच मृतांना श्रद्धांजली वाहिली असून त्यांच्या कुटुंबीयांप्रती संवेदना व्यक्त केल्या आहेत.
CM takes cognisance of the incident in Sonbhadra (firing b/w 2 groups over a land dispute) & expressed condolences to family of deceased; directed DM to provide immediate medical attention to injured. He also directed DGP to personally monitor the case & ensure effective action. pic.twitter.com/qfG1tk7XP4
— ANI UP (@ANINewsUP) July 17, 2019
मृतांची नावे –
पुरूष : रामचंदर (50), राजेश गौड़ (28), अशोक (30), रामधारी (60)
महिला – अज्ञात (45) दुर्गावती (42), राम सुंदर (50), जवाहिर (48), सुखवंती (40)
























































