‘इंडियन आयडल मराठी’ या कार्यक्रमामध्ये भारतरत्न लतादीदींना स्वरांजली

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सोनी मराठी वाहिनीवरील ‘इंडियन आयडल मराठी या कार्यक्रमात येत्या 14 फेब्रुवारीला लता दीदींना स्वरांजली वाहण्यात येणार आहे.

संगीतसृष्टीला पडलेलं सुरेल स्वप्न म्हणजे लता मंगेशकर. दीदींनी आपल्या वडिलांकडून गाण्याचं प्रशिक्षण घेऊन अगदी कमी वयात गाण्याची सुरुवात केली. गेली अनेक दशकं लता मंगेशकर या प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवत आहेत. नायिकांच्या तब्बल चार पिढ्यांना लता दीदींनी आवाज दिला आहे. त्यांचा इहलोकीचा प्रवास जरी संपला असला, तरी त्या त्यांच्या गाण्याच्या रूपाने येणारी अनेक दशकं त्या जिवंत असणार आहेत.

‘इंडियन आयडल मराठी’च्या मंचावर स्पर्धक आणि परीक्षक अजय-अतुल यांनी भारतरत्न लता मंगेशकर यांना स्वरांजली वाहिली. या वेळी गीतकार-कवी गुरू ठाकूर आणि सौमित्र हेसुद्धा उपस्थित होते. हा खास भाग प्रेक्षकांना 14 फेब्रुवारीला पाहायला मिळणार आहे. हा २ तासांचा विशेष भाग असणार आहे.

पाहा, इंडियन आयडल मराठी, 14 फेब्रुवारी, रात्री 9 वा. सोनी मराठी वाहिनीवर.