लातूर जिल्ह्यात कोरोनाचा स्फोट, गेल्या 14 दिवसात 16 हजारहून अधिक रुग्ण

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

लातूर जिल्ह्यामध्ये कोरोनाबाधित रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत अहे. मागील चार दिवसात मराठवाड्यात सर्वाधिक रुग्ण लातूर जिल्ह्यात वाढत असल्याचे चित्र दिसून येत आहे. एप्रिलच्या 14 दिवसातच तब्बल 16 हजार 738 कोरोनाबाधित रुग्ण आढळलेआहेत.

लातूर जिल्ह्यात कोरोनाचा झालेला हा स्फोट सोशल डिस्टसिंग न पाळणे, मास्कचा वापर न करणे, लग्न समारंभामध्ये काळजी न घेणे, बाजारपेठेत अकारण गर्दी आदी कारणांमुळे झालेला आहे. राज्यशासनाने निर्बंध घालून दिलेले असले तरी त्याची कडकपणे अंमलबजावणी लातूर शहर आणि जिल्ह्यात होताना दिसत नाही. वाढत जाणार्‍या रुग्णसंख्येमुळे लातूरकर हवालदिल झाले आहेत.

मार्चच्या पहिल्या दिवशी 49 कोरोनाबाधित रुग्ण होते. मात्र त्यात वाढ होत मार्च अखेर दिवशी तब्बल 667 वर रुग्ण संख्या पोहचली होती. मार्च महिन्यातील एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या तब्बल 8 हजार 56 वर गेली तर एप्रिल च्या 14 दिवसातच रुग्ण संख्या 16 हजार 738 वर पोहचली आहे.