लातूर जिल्ह्यात 295 पॉझिटीव्ह रुग्ण वाढले, उपचारादरम्यान 5 रुग्णांचा मृत्यू

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

लातूर जिल्ह्यात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढत असतानाच रुग्ण बरे होण्याचे प्रमाणही वाढत आहे. लातूर जिल्ह्यात 295 पॉझिटीव्ह रुग्ण वाढले, उपचारादरम्यान 5 रुग्णांचा मृत्यू ८२७० रुग्ण उपचाराने बरे झालेले आहेत. तर नवीन २९५ कोरोनाबाधित रुग्ण वाढलेले आहेत. तर उपचारा दरम्यान ५ रुग्णांचा मृत्यू झाल्याचे प्रशासनाने जाहिर केलेले आहे.

लातूर जिल्ह्यातील कोरोनाचे मिटर वेगात पळत आहे. आज पुन्हा तब्बल २९५ कोरोनाबाधित रुग्णांची वाढ झालेली आहे. २६९ आरपीसीआर टेस्ट करण्यात आलेल्या होत्या त्यामध्ये ४९ जण पॉझिटीव्ह आढळून आलेले आहेत. तर ११०३ रॅपीड अ‍ॅन्टीजीन टेस्ट करण्यात आलेल्या होत्या त्यामध्ये २४६ रुग्ण पॉझिटीव्ह आढळून आलेले आहेत. जिल्ह्यातील कोरोनाबाधित रुग्णांची एवूâण संख्या आता ११६२९ एवढी झालेली आहे. आज तब्बल ३३५ रुग्ण उपचाराने बरे होऊन घरी परतलेले आहेत तर आजपर्यंत एवूâण ८२७० रुग्ण उपचाराने बरे होऊन घरी परतलेले आहेत. ५ रुग्णांचा उपचारादरम्यान आज मृत्यू झाल्याचे प्रशासनाने जाहिर केलेले आहे. लातूर जिल्ह्यात आजपर्यंत कोरोनामुळे ३४४ रुग्णांचा मृत्यू झालेला आहे.