ओबीसी समाजाच्या विविध मागण्यांसाठी शिरुर अनंतपाळ येथे मोर्चा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी। शिरुर अनंतपाळ

तालुक्यातील ओबीसी समाजाने त्यांच्या विविध मागण्यांसाठी ९ जानेवारी रोजी मोर्चा काढला. हा मोर्चा सकाळी दहा वाजता उदगीर रोड येथून निघाला त्यानंतर महात्मा बसवेश्वर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून विविध मागण्यांचे निवेदन तहसीलदारांना देण्यात आले.

महाराष्ट्र शासनाने मराठा समाजबांधवांना आरक्षण जाहीर केले. नवीन आरक्षणामुळे मूळ विषय आरक्षणावर काय परिणाम होईल या संदर्भात शासनाची भूमिका संदिग्ध आहे. यामूळे मूळ ओबीसी समाज व नवीन जाहीर केलेले मराठा समाज आरक्षण यामध्ये स्पष्टपणे वर्गीकरण होणे आवश्यक आहे. हे महाराष्ट्र शासनाने न करता मूळ विषय व मराठा समाजबांधव यामध्ये भांडणे लावायचे काम केले आहे. यामुळे महाराष्ट्र शासनाचा या मोर्चाद्वारे निषेध करण्यात येत आहे व मागण्याचे निवेदन तहसीलदार यांना देण्यात आले.

सदर निवेदनामध्ये ओबीसींच्या आर्थिक महामंडळास भरीव तरतूद करून मदत करण्यात यावी. मराठा समाजास दिलेले आरक्षण कोर्टात टिकावे व ओबीसीच्या आरक्षणास धक्का न लागता मराठा समाजास आरक्षण देण्यात यावे. ओबीसी व मराठा समाजामध्ये सरकारने भांडणे लावल्याने ओबीसी समाजातर्फे शासनाचा निषेध करणे. ओबीसींच्या आरक्षणासंदर्भात शासनाची संदिग्ध भूमिका स्पष्ट करावी. धनगर समाजात तात्काळ आरक्षण देण्यात यावे. ओबीसी चा सरकारी नोकरीत ला बॅकलॉग भरून काढावा. भारत सरकारने जातनिहाय केलेली जनगणना त्यामधील ओबीसी संख्याचा तपशील जाहीर करावा. ओबीसीचा आजपर्यंत असलेला अनुशेष भरून काढावा आदी मागण्या करण्यात आल्या आहेत.