
सामना प्रतिनिधी। लातूर
शहर आणि जिल्ह्यात बंद घरे फोडण्याचे सत्र सुरुच असून सोमवारीही बंद घर फोडून चोरट्यांनी चोरी केली. यावेळी चोरट्यांनी सोन्या चांदीचे दागिने आणि रोख रोकड असा सुमारे 47 हजार रुपयांचा मुद्देमाल चोरुन नेला आहे.
अमोल जगताप कदम यांच्या घरी ही चोरी करण्यात आली आहे. कदम यांचे घर स्नेह नगर येथे आहे. सोमवारी लातूरातील घर बंद करुन ते गावाकडे गेले होते.8 जानेवारी रोजी दुपारी ते लातूरात पोहंचले तेंव्हा घरातील कुलूप तोडण्यात आल्याचे निदर्शनास आले. पोलीस ठाण्यात या चोरीची तक्रार त्यांनी दाखल केली. कपाटातील सोन्या चांदीचे दागिने ज्यात एक तोळ्याची सोन्याची चैन, 5 ग्रॅमची एक चैन, अर्धा ग्रामच्या तीन सोन्याच्या अंगठ्या , 3 ग्रॅमचे एक सोन्याचे बदाम असा सुमारे 47 हजार रुपयांचा मुद्देमाल पळवण्यात आला आहे. अज्ञात व्यक्ती विरुध्द पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून पोलीस पुढील तपास करीत आहेत.































































