‘अशा’ पद्धतीने ठेवा फ्रीजमध्ये चीज, दीर्घकाळ टिकेल

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

चिज खायला सर्वच वयोगटातील व्यक्तिंना आवडते. रोटी, सँडविच, पराठे, पावभाजी किंवा एखाद्या विशिष्ट पदार्थांत चिज घातल्यास मुलं आवडीने तो पदार्थ खातात. चिजमुळे नाश्ता किंवा टिफीन बनवणेही सोपे होते. दुग्धजन्य पदार्थांमध्ये पोषक तत्त्वे, कॅल्शियम आणि जीवनसत्त्व डी मुबलक प्रमाणात असते. यामुळे हाडेही मजबूत होतात. बऱ्याचदा रोजच्या स्वयंपाकात हा पदार्थ वापरला जातो त्यामुळे बाजारातून जास्त प्रमाणात विकत आणलेले चिज फ्रिजमध्ये ठेवले जाते, पण काही दिवसांत ते कोरडे होऊ लागते किंवा खराब होऊ लागते. फ्रीजमध्ये चिज ठेवले तरीही ते ताजे राहात नाही किंवा खराब होण्याची अनेक कारणे असू शकतात, असे होऊ नये यामुळे फ्रिजमध्ये चीज कसे ठेवायचे जेणेकरून ते जास्तीत जास्त दिवस ताजे राहिल, याविषयी जाणून घेऊया. याकरिता सर्वप्रथम बाजारातून चीज विकत घेताना एक्सपायरी डेट तपासणे आवश्यक आहे तसेच एक्सपायरी डेट जवळ आल्यास असे चिज खरेदी करू नका.

फ्रीजमध्ये चिज ठेवण्यापूर्वी काय कराल ?
काही जणांना चीज प्लास्टिकच्या पिशवीत ठेवण्याची सवय असते, मात्र ही पद्धत चुकीची आहे. यामुळे चीज ताजे राहात नाही. उलट ते लवकर खराब होण्याची शक्यता असते. याऐवजी जास्त चीज जास्त दिवस ताजे ठेवायचे असेल, तर चीज बॅग किंवा चीज पेपर वापरू शकता. या वस्तू चीजला हवेच्या संपर्कापासून वाचवण्याचे काम करतात. यामुळे चीज जास्त काळ ताजे राहाते. मेण किंवा पार्चमेंट पेपरमध्ये गुंडाळून ठेवू शकता. गुंडाळल्यानंतर ते कोणत्याही झिप लॉकच्या पाऊचमध्ये ठेवता. यामुळे पाऊचमध्ये हवा जात नाही आणि चीज कोरडे होत नाही शिवाय बरेच दिवस टिकते. जर एखाद्या भांड्यात चीज ठेवणार असाल तर एकाच भांड्यात जास्त दिवस चिज ठेवू नका. दर दोन दिवसांनी चिज ठेवलेले भांडे बदलावे, यामुळे चिज जास्त दिवस टिकेल. लगेच खराब होणार नाही.