Tips – रिकाम्या पोटी ‘ही’ 5 कामं अजिबात करू नका, रिसर्चमध्ये धक्कादायक खुलासा

शरीरात उर्जा निर्माण होण्यासाठी आणि प्रत्येक अवयवाला आवश्यक पोषणमुल्य मिळण्यासाठी आहाराची आवश्यकता असते. साधारणत: एक व्यक्ती सकाळी नाष्ता, दुपारी जेवण, संध्याकाळी हलका आहार आणि रात्रीचे जेवण करतो. जवळपास प्रत्येक व्यक्तीचा हा क्रम ठरलेला असतो.

बऱ्याचदा भूकेची वेळ झाली की सुस्तपणा येतो. वेळेत खायला नाही मिळाले की काही वेळा मूडही खराब होऊ शकतो आणि रागही येऊ शकतो. तसेच कामातही मन लागत नाही. अर्थात प्रत्येक वेळी आपण भरपेट राहू शकत नाही. कामाच्या वेळात बऱ्याचदा आपण भूकेकडेही कानाडोळा करतो आणि काम करत राहतो. मात्र एका रिसर्चनुसार भूक लागल्यानंतर काही गोष्टी करू नयेत, याचा परिणाम भविष्यात वाईट होऊ शकतो.

व्यायाम करणे टाळा

अनेकांना असे वाटते की रिकाम्या पोटी व्यायाम केल्यास अतिरिक्त चरबी कमी होते, परंतु हे चुकीचे आहे. पोट रिकामे असल्याने आधीच आपली उर्जा कमी झालेली असते, त्यामुळे व्यायाम करताना शारिरीक नुकसान होण्याची शक्यता असते. त्यामुळे काहीतरी हलका आहार घेऊन व्यायाम करणे चांगले.

मसालेदार भोजन टाळा

रिकामे पोट असताना जर तुम्ही मसालेदार जेवण केले तर पोटात जळजळ होऊ शकते आणि पोट खराब होऊ शकते. पोटात जळजळ होऊ नये यासाठी मसालेदार पदार्थ खाण्यापूर्वी काहीतरी पौष्टिक खा. शक्यतो मसालेदार पदार्थ नाष्त्यात खावू नका. तसेच रिकाम्या पोटी दारुचेही सेवन करू नका.

फुफ्फुसांना मजबूत बनवते गुणकारी तुळस, ‘या’ 5 गोष्टींसोबत घेतल्यास रोगप्रतिकारशक्ती वाढेल

निर्णय घेणे टाळा

रिचर्सनुसार, रिकाम्या पोटी व्यक्ती योग्य निर्णय घेऊ शकत नाही. याबाबत नेदरलँडच्या यूट्रेच विश्वविद्यालयाच्या संशोधकांनी अभ्यास केला आहे. रिकाम्या पोटी माणूस कमी विचार करतो आणि आवेगात चुकीचा निर्णय घेऊ शकतो. याला कारण गॅस्ट्रोइन्टेस्टायनल टॅक्टमध्ये असणाऱ्या घ्रेलिन नावाचे हार्मोन्स डोक्यातील नसांवर प्रभाव टाकतात. त्यामुळे निर्णय क्षमतेवर परिणाम होतो.

सहकाऱ्यांसोबत वाद घालू नका

तुमचे सहकारी किंवा जवळचे व्यक्ती तुमच्यावर कितीही नाराज असले तरी रिकाम्या पोटी तुम्ही त्यांच्यासोबत वाद घालू नका. काहीतरी खा आणि मग विचार करुन निर्णय घ्या. कारण रिकाम्या पोटी मेंदू योग्य विचार करू शकत नाही. अशा काळात व्यक्ती बहुतांश वेळी नको त्या गोष्टी करतो.

निरोगी त्वचा आणि रोगप्रतिकारक क्षमता वाढण्यासाठी टोमॅटो ज्यूस रामबाण उपाय, जाणून घ्या फायदे

खरेदीला जावू नका

जर तुम्ही खरेदीला जाण्याचा विचार करत असाल तर काहीतरी खावून जा. कारण रिकाम्या पोटी व्यक्ती अनावश्यक खरेदी करतो. अशा वेळी व्यक्ती तळलेले पदार्थ, फास्ट फूड आणि मिष्ठान्न खाण्याकडे वळतो. यामुळे खिसा तर रिकामा होतोच शिवाय या पदार्थांमुळे शरीरावरही वाईट परिणाम होतो.

Tips – गुळवेलच्या सेवनाने रोगप्रतिकारक क्षमता वाढण्यासह ‘हे’ 5 आजारही राहतील कोसो दूर

आपली प्रतिक्रिया द्या