
सामना प्रतिनिधी । हडोळती
हडोळती येथील लिंगायत स्मशानभुमीसाठी वाढीव जागा उपलब्ध करून देण्याची मागणी करण्यात आली आहे. येथील लिंगायत स्माशानभूमी ही स्वातंत्र्यपुर्व लोकसंख्येनुसार निश्चीत करून दिलेली जागा फारच अपूरी पडत आहे. आजघडीला या समाजाची लोकसंख्या जवळपास २००० च्या आसपास गेलेली आहे. त्यामुळे ही जागा आजच्या लोकसंख्येच्या प्रमाणात फारच अपुरी पडत आहे. त्यामुळे वर्ष किंवा सहा महिन्यापूर्वी अंत्यविधी केलेल्या खड्डा जागी पुनश्च त्याच ठिकाणी मयत व्यक्तीचा अंत्यविधी करावा लागत आहे. खड्डा खोदताना जुन्या मृत व्यक्तीचे अवशेष काढून मृत व्यक्तीचा त्याच खड्ड्यात अंत्यविधी करावा लागतो. ही गोष्ट समाजाला व अंत्यविधीला आलेल्या लोकांना ही घटना लाजीरवानी वाटत आहे. त्यामुळे हडोळती येथील लिंगायत व त्यांच्या उपजाती यांना प्रशासनाने वाढीव जागा उपलब्ध करून नोंद असलेली स्मशानभूमीच्या जागेची प्रत्यक्ष मोक्यावर येऊन पाहणी करून समाजासाठी व जागेवरील मयत व्यक्तीची विटंबना टाळावी व समाजाला न्याय द्यावा, अशी मागणी अहमदपूर तहसिलदार यांना निवेदनाद्वारे केली आहे.
या निवेदनावर संजय मिरजगावे, विश्वनाथ हेंगणे, रवी निजवंते (उपसरपंच) संजय मलशेट्टे, विशाल लव्हराळे, संदिप गुड्डा, मुकेश कोरनुळे, धनंजय गऊळकर, रवी गोरे, अभिजित निजवंते, उमाकांत निजवंते, अरूण गोरे, उमाकांत लव्हराळे, भिमाशंकर हेंगणे, सुर्यकांत फुलारी, बाळू कस्तुरे, भुषण मलशेटे, अभिषेक हेंगणे, संगमेश्वर गोरे, नितीन लव्हराळे, योगेश मिरजगावे यांच्या स्वाक्षऱ्या आहेत. एक महिन्यापर्यंत या प्रश्नावर न्याय न मिळाल्यास हे कार्यकर्ते स्मशान भूमीच्या प्रश्नावर न्याय मिळेपर्यंत कायदेशीर मार्गाचा अवलंब करून प्रशासनाविरुद्ध उपोषणाला बसणार आहेत. त्यास प्रशासनास जवाबदार धरण्यात येईल, अशी मागणी करण्यात आली आहे.

































































