
सामना ऑनलाईन । लखनौ
लोकसभा निवडणुकीचे वातावरण तापलेले असतानाच बहुजन समाजवादी पक्षाच्या सर्वेसर्वा मायावती यांनी मी यंदा लोकसभा निवडणूक लढवणार नाही घोषणा आज केली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, भाजपच्या केंद्रीय मंत्री सुषमा स्वराज, उमा भारती यांच्या नंतर मायावती यांनी देखील यंदा लोकसभा निवडणूक न लढवण्याचा निर्णय घेतला आहे. अनेक दिग्गज नेत्यांनी या निवडणुकीत माघार घेतल्याचे पाहायला मिळत आहे.
Bahujan Samaj Party (BSP) Chief Mayawati: I will not contest the Lok Sabha elections. pic.twitter.com/88oGmtd6Ww
— ANI UP (@ANINewsUP) March 20, 2019
पक्षाच्या विजयासाठी आणि देशातील सद्यस्थितीचा विचार करता आपण लोकसभेची आगामी निवडणूक लढवणार नसल्याचे बसपा अध्यक्षा मायवती यांनी बुधवारी जाहीर केले. उत्तर प्रदेशात बसपा मजबूत स्थितीत असून कोणत्याही जागवेरून मला विजय मिळण्याचा विश्वास आहे. मात्र, आपल्या मतदारसंघात आपल्याला मताधिक्याने विजयी करण्यासाठी कार्यकर्ते सर्व ताकद पणाला लावतील. त्याचा इतर जागांच्या प्रचारावर परिणाम होऊ शकतो. मात्र, पक्षाच्या हिताचा आणि देशाच्या सद्यस्थितीचा विचार करता आपण निवडणूक लढवणार नसल्याचे मायावती यांनी स्पष्ट केले.




























































