अजित पवार गटाला दापोलीत धक्का; बुरोंडी विभाग अध्यक्षांनी हाती घेतली शिवसेनेची मशाल

राष्ट्रवादी अजित पवार गटाचे प्रदेशध्यक्ष सुनिल तटकरे हे आपल्या निवडणूक प्रचारार्थ शनिवारी दापोली दौ-यावर आले होते. त्यांची पाठ फिरत नाही तोच दापोलीत बुरोंडी विभाग अध्यक्ष नवरंग बागकर आणि देवके येथील देवेंद्र ऊर्फे नाना बैकर यांनी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) संपर्क कार्यालयात माजी आम. संजय कदम यांच्या प्रमुख उपस्थितीत शिवसेनेत जाहीर प्रवेष केला. त्यामुळे अजित पवार गटाला हा मोठा धक्का बसला आहे.

दापोलीत बुरोंडी विभाग अध्यक्ष नवरंग बागकर आणि देवके येथील देवेंद्र ऊर्फे नाना बैकर यांच्या पक्षप्रवेशादरम्यान  शिवसेना तालुका प्रमुख ऋषिकेश गुजर, तालूका सचिव नरेंद्र करमरकर, दापोली तालूका कार्यालय प्रमुख शंकर साळवी, माजी बांधकाम सभापती विश्वास कदम, जालगाव विभाग प्रमुख शैलेश पांगत, सुनिल जाधव, विभाग प्रमुख विलास कलमकर, अनंत पाटील आदी उपस्थित होते.

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्ष प्रमुख उध्दव ठाकरे आणि युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांचे जनहिताचे विचार देश आणि राज्याची प्रगती करू शकतात हा विचार पुढे घेवून मार्गक्रमण करणारे दापोली विधानसभा मतदार संघाचे माजी आम. संजय कदम यांच्या नेर्तृत्वाखाली दापोलीत शिवसेना संघटन मजबुत स्थितीत उभे राहत आहे. चारच दिवसापूर्वी पालगड जिल्हा परिषद गटातील शिरखल दगडवणे येथील मोठा पक्ष प्रवेश झाल्यानंतर आता बुरोंडी गटाचे विभाग अध्यक्ष नवरंग बागकर आणि देवके येथील देवेंद्र बैकर यांनी त्यांच्या सहका-यांनी शिवसेनेची कास धरत हाती मशाल घेतली आहे.