लंडनच्या स्वामी नारायण मंदिरातून भगवान श्रीकृष्णाच्या मूर्ती चोरीला

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन । लंडन

लंडनच्या विल्सडनमधील स्वामीनारायण मंदिरातील 43 वर्षापूर्वीच्या श्रीकृष्णाच्या तीन मूर्त्यांसह रोकड आणि इतर सामानही शुक्रवारी रात्री चोरट्यांनी लांबवले. दिवाळी उत्सव संपल्यानंतर काही तासातच मंदिरात चोरी झाल्याची माहिती मंदिर समितीचे अध्यक्ष कुर्जीभाई केराई यांनी दिली. 1975 मध्ये मंदिराची स्थापना झाल्यापासून या मूर्ती मंदिरात असल्याचे त्यांनी सांगितले. त्यामुळे या मूर्त्यांशी भाविकांची आस्था जोडलेली असल्याचे ते म्हणाले.

पोलिसांना घटनेची माहिती मिळताच त्यांनी तपासाला सुरूवात केली. आतापर्यंत या प्रकरणी कोणालाही अटक करण्यात आलेली नाही. या मूर्त्यां पितळेच्या होत्या. चोरट्यांनी सोन्याच्या समजून या चोरल्याची शक्यता मंदिर प्रशासनाने वर्तवली आहे. तसेच चोरटे या मूर्त्यां परत करतील अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली आहे. या मूर्त्यां पितळेच्या असल्या तरी भाविकांची आस्था असल्याने त्या बहुमोल असल्याचे प्रशासनाने म्हटले आहे. पोलिसांनी हे प्रकरण गंभीरतेने घेतले असून सीसीटीव्ही फूटेज आणि फॉरन्सिक तज्ज्ञांची मदत घेण्यात येत आहे.

लंडनमध्ये स्वामीनारायण यांची अनेक मंदिरे आहेत. त्यातील विल्सडनमधील हे मंदिर प्रसिद्ध आहे. उत्तर लंडनमध्ये युरोपातील सर्वात मोठे स्वामी नारायण यांचे मदिर आहे. या मंदिरानेही या चोरीच्या घटनेबाबत खेद व्यक्त केला आहे. लंडनचे महापौर सादिक खान आणि प्रशासनाला या प्रकरणात लक्ष घालण्याची विनंती करण्यात आली आहे.