
राज्यात लम्पी रोगामुळे आतापर्यंत 4 हजार जनावरे दगावली आहेत. मृत जनावरांचे मालक व शेतकऱ्यांना आर्थिक सहाय्य देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. त्यानुसार मृत पडलेल्या दुभत्या जनावरांच्या पशुपालकांना 30 हजार रुपये, ओढकाम करणाऱ्या जनावरांच्या पशुपालकांना 25 हजार रुपये आणि वासरांच्या मालकांना 16 हजार रुपये आर्थिक सहाय्य देण्यात येणार आहे.
राज्यात गेल्या काही दिवसांपासून लम्पी रोगाचा प्रादुर्भाव वाढत आहे. नुकत्याच पार पडलेल्या पावसाळी अधिवेशनातही यासंदर्भात चर्चा झाली होती. 4 ऑगस्टपासून ज्या शेतकऱ्याच्या, पशुपालकांकडील जनावरांचा मृत्यू झाला असेल त्यांना ही मदत मिळणार आहे. या निर्णयामुळे राज्यातील पशुमालकांना मोठा दिलासा मिळणार आहे.




























































