
झी मराठी अवॉर्डस् म्हणजेच नात्यांचा महाउत्सव आणि या उत्सवात हजेरी लावली ती बॉलीवूडच्या तारका मलायका अरोरा आणि ‘धक धक गर्ल’ माधुरी दीक्षित यांनी. माधुरी आणि मराठमोळ्या अंदाजातील मलायका धम्माल करताना दिसणार आहेत. मलायकाचं कोळीनृत्य हे कार्यक्रमाचं खास आकर्षण आहे. श्रेया बुगडेकडून बेसनाचे लाडू बनवायला शिकून मलायका हे खास लाडू ‘सारेगामा लिटिल चॅम्प्स’चे परीक्षक सलील कुलकर्णींना देणार आहे. माधुरी दीक्षितची मंगळागौर आणि तिच्यासोबत भाऊ कदम आणि भुवनेश्वरीची हास्याची जुगलबंदी रंगणार आहे. अक्षरा आणि अधिपती यांची जोडी कार्यक्रमाचे बहारदार सूत्रसंचालन करेल. हा कार्यक्रम 4 नोव्हेंबर, सायंकाळी 7 वाजता पाहता येईल.
























































