
श्रीसंत सेना नाभिक समाज आणि श्री विठ्ठल रखुमाई मंदिर ट्रस्ट, वांद्रे यांच्यावतीने गेली 82 वर्षे श्री विठ्ठल रखुमाई मंदिरात आषाढी एकादशीनिमित्त महाअभिषेक पूजेचे आयोजन करण्यात येते. या वर्षी ही महाअभिषेक पूजा मिठाईचे प्रसिद्ध उद्योजक प्रशांत सपकाळ यांच्या हस्ते शनिवार, 9 जुलैला रात्री 11 वाजता होणार आहे. दरम्यान, 10 जुलैला आषाढीनिमित्त मंदिरात अनेक धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे. त्याला भाविकांनी उपस्थित राहून दर्शनाचा लाभ द्यावा, असे आवाहन संस्थेचे अध्यक्ष वाल्मिक वाघ यांनी केले आहे.
























































