
वर कोऱ्या आभाळाची भट्टी तापली आहे. तापमानाचा चढता पारा जमिनीतील पाणी आटवू लागला आहे. परिणामी महाराष्ट्रातील सुमारे 800 गावे आणि 2500 वाडय़ा तहानेने व्याकुळ झाल्या आहेत. तिथे तीव्र पाणीटंचाई निर्माण झाली आहे. राज्यात मराठवाडा सर्वाधिक कोरडाठाक पडला आहे. टंचाईग्रस्त गावांना 868 टॅंकरद्वारे पिण्याच्या पाण्याचा पुरवठा केला जात असून ही संख्याही दिवसेंदिवस वाढत चालली आहे.
सरकारच्या पाणीपुरवठा विभागाने 25 मेपर्यंत संपलेल्या आठवडय़ाची पाणी पुरवठय़ाची स्थिती दिली आहे. त्यानुसार राज्यातील 783 गावे आणि 2304 वाडय़ांना एपूण 868 टॅंकरद्वारे पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करण्यात येत आहे. त्यातील 45 टॅंकर्स हे शासकीय तर 823 टॅंकर्स हे खासगी आहेत. सर्वाधिक टॅंकर हे मराठवाडय़ात पुरवावे लागत आहेत.
छत्रपती संभाजीनगर विभागात जालना, बीड, परभणी, हिंगोली, नांदेड, धाराशीव, लातूरजिल्ह्यात 275 टॅंकर्सद्वारे पाणी पुरवठा केला जात आहे. नाशिक विभागात 222, अमरावती विभागात 22 टॅंकर्सद्वारे पाणी पुरवठा केला जात आहे. ठाणे, पुणे, नागपूर विभागातील पाणीपुरवठय़ाची स्थिती सध्यातरी चांगली असून तिथे टॅंकरद्वारे पाणी पुरवठा करण्याची वेळ अद्याप आलेली नाही. मे महिन्याच्या तिसऱया आठवडय़ात राज्यात एपूण 634 टॅंकर्स लागत होते. मागील वर्षीच्या मे महिन्यात पाणीटंचाई यापेक्षा तीव्र होती. मे महिन्याच्या चौथ्या आठवडय़ात 1475 टॅंकर्सद्वारे पाणीपुरवठा करावा लागला होता.
































































