राज्यातील 92 नगर परिषदांच्या 18 ऑगस्टला निवडणुका, कमी पाऊस असलेल्या भागात मतदान

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

राज्यातल्या 92 नगर परिषदा आणि चार नगरपंचायतीमधील सार्वत्रिक निवडणुका जाहीर करण्यात आल्या आहेत. 18ऑगस्ट रोजी मतदान होईल तर दुसऱयाच दिवशी मतमोजणी होईल. या निवडणुका ओबीसी आरक्षणाशिवाय पार पडणार आहेत. त्यामुळे या निवडणुका ओबीसी आरक्षणाशिवाय घेऊ नयेत अशी मागणी काँग्रेसने केली आहे.

निवडणूक आयोगाने निवडणूक कार्यक्रम आज जाहीर केला आहे. त्यानुसार . पुणे, सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर, नाशिक, धुळे, नंदुरबार, जळगाव, नगर, संभाजीनगर, जालना, बीड, धाराशीव, लातूर, अमरावती आणि बुलढाणा या सतरा जिह्यांतील 92 नगर परिषदा आणि चार नगरपंचायतीमध्ये निवडणुका होतील. पाऊस कमी असलेल्या जिह्यांमध्ये या निवडणुका घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

निवडणूक कार्यक्रम

18 ऑगस्ट – मतदान
19 ऑगस्ट -मतमोजणी
20 जुलैपासून निवडणूक प्रक्रिया सुरू
उमेदवारी अर्ज दाखल करण्याची तारीख- 22 ते 28 जुलै
उमेदवारी अर्ज मागे घेण्याची तारीख- 4 ऑगस्ट दुपारी तीनपर्यंत