भिवंडीच्या वलपाडा भागात 3 मजली इमारत कोसळली, 40 ते 45 जण ढिगाऱ्याखाली दबल्याची भीती

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

भिवंडीमध्ये वलपाडा भागात तीन मजली इमारत कोसळली आहे. शनिवारी दुपारच्या सुमारास ही दुर्घटना घडली. या दुर्घटनेमध्ये 40 ते 45 जण ढिगाऱ्याखाली दबल्याची भीती व्यक्त केली जात आहे. दुर्घटनेची माहिती मिळताच पोलीस आणि अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेतली असून बचावकार्य सुरू आहे.

सविस्तर वृत्त थोड्याच वेळात….