कोरोना वाढल्यास निवडणुका पुढे ढकलाव्या लागतील, मंत्री विजय वडेट्टीवार यांचे विधान

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

राज्यातील कोरोना रुग्णसंख्या वाढत आहे. गुरुवारी नवीन कोरोना रुग्णांचा आकडा हजार पार गेल्याने चिंतेच ढग दाटले आहे. अशातच कोरोना वाढल्यास आगामी महानगरपालिकांच्या निवडणुका पुढे ढकलाव्या लागतील असे विधान मदन व मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना केले आहे.

पुढील आठ ते दहा दिवस महत्त्वाचे असून या दिवसांमध्ये रुग्णसंख्या किती पटीने वाढतेय, काय परिस्थिती निर्माण होतेय यावर सर्व अवलंबून आले. येणाऱ्या निवडणुकांसाठी बराच कालावधी बाकी आहे. साधारणपणे ऑगस्ट-सप्टेंबरमध्ये हा प्रोग्राम स्पष्ट होईल. या दरम्यान दोन महिन्यातील एकूण परिस्थितीवर चर्चा होईल. मात्र परिस्थिती उद्भवलीच तर निवडणुका पुढे ढकलण्याची विनंती निवडणूक आयोगाला करण्यात येईल, असे वडट्टीवार म्हणाले.

निवडणुकांच्या माध्यमातून लोकांची गर्दी होणे, संसर्ग वाढणे अशी परिस्थिती निर्माण झाली तर निवडणुका टाळता येतील का हा देखील प्रश्न आहे. कोरोना वाढल्यास आम्ही निवडणूक आयोगाला तशी विनंतीही करू. परंतु निवडणूक टाळायच्या की नाही हा निर्णय घेण्याचा अधिकार निवडणूक आयोगाचा आहे, असेही ते म्हणाले.

राज्यसभा निवडणुकांबाबतही मंत्री वडेट्टीवार यांनी भाष्य केले. राजकीय वातावरण तापले असून सामान्य जनतेला याच्याशी काही देणे-घेणे नाही. निवडणूक बिनविरोध व्हावी असा आमचा प्रयत्न असल्याचे ते म्हणाले.

सोनिया गांधींनंतर प्रियंका गांधींना कोरोनाची लागण, ट्विट करून दिली माहिती

कश्मिरमध्ये सुरू असलेल्या टार्गेट किलिंगबाबत बोलताना वडेट्टीवार म्हणाले की, कश्मिरी पंडितांचा मुद्दा आपण पाहिला असून त्या काळातील परिस्थिती निवळले होती. पर्यटकही वाढले होते. परंतु हे हल्ले केंद्राच्या भूमिकेवर प्रश्न उपस्थित करणार आहेत. केंद्राने कडक भूमिका घेऊन उपाययोजना कराव्या असेही वडेट्टीवार म्हणाले.

भाजपने कश्मीरला केवळ सत्तेची शिडी बनवले; राहुल गांधी यांची टीका