
सामना ऑनलाईन । मुंबई
विरोधी पक्ष नेते राधाकृष्ण विखे पाटील यांचे चिरंजीव सुजय विखे पाटील यांनी अखेर भाजपचा रस्ता धरला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत सुजय विखे पाटील यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. सुजय विखे पाटील यांच्या नावाची खासदारकीसाठी शिफारस करणार असल्याचेही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केले. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वातील पक्षाची निवडणूक संसदीय निवड समिती यावर निर्णय घेईल. मात्र इकडून नाव गेल्यावर तिकडून सहसा नकार येत नाही, असं सूचकं वक्तव्य देखील त्यांनी यावेळी केले. त्यामुळे खासदारकीसाठी सुजय विखे पाटील यांच्या नावावर शिक्कामोर्तब होईल असे स्पष्ट संकेत मिळाले आहेत.
Live Update Lok Sabha 2019 :
- इकडून नाव गेल्यावर तिकडून होकार येईलच
- मोदींच्या नेतृत्वातील निवडणूक संसदीय निवड समिती यावर निर्णय घेईल
- सुजय विखे पाटील यांच्या नावाची खासदारकीसाठी शिफारस करणार
- सुजय विखे पाटील यांनी कोणतीही अट घातलेली नाही
- सुजय विखे पाटील यांनी मोदींच्या नेतृत्वात दमदार पाऊल टाकण्याचा निर्णय घेतला
- देशातील गरीब, शेतकरी, महिला यांच्या संदर्भातील परिवर्तानाच्या योजना मोदींच्या नेतृत्वात आल्या
- आज नगर जिल्ह्याला नवे सुशिक्षित नेतृत्व मिळत आहे
- उपस्थित सर्वांचे स्वागत करतो-मुख्यमंत्री
- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे भाषण सुरू
- राज्यातली हवा युतीच्या दिशेने आहे, रावसाहेब दानवे यांचे वक्तव्य
- भाजपच्या आमदार-खासदारांनी देखील मला पाठिंबा दिला, मार्गदर्शन केलं, सांभाळून घेतलं
- भाजपच्या मार्गदर्शनाखाली मी आई-वडिलांना अभिमानास्पद वाटेल असं काम करून दाखवेन
- माझ्या आई-वडिलांचा याला सहमती आहे की नाही ते माहीत नाही
- भाजपमध्ये जाण्याचा निर्णय माझा आहे
- माझ्या वडिलांच्या विरोधात जाऊन मी हा निर्णय घेतला आहे
- माझ्या संकटाच्या काळात ज्यांनी मला मदत केली, पाठिंबा दिला
Sujay Vikhe Patil:I’ve taken this decision against my father’s wishes. I don’t know how much my parents will support this decision, but I’ll try my best to make my family proud by working under the guidance of BJP. CM & other BJP MLAs were supportive & helped me take the decision pic.twitter.com/7g0NGAAAnV
— ANI (@ANI) March 12, 2019
- देवेंद्र फडणवीस यांनी वडिलांची भूमिका निभावली
- मी सगळण्यांचे आभार मानतो
- मला आनंद वाटतो की मला भाजपमध्ये कार्यकर्ता म्हणून काम करण्याची संधी दिली- सुजय विखे
- खासदार दिलीप गांधी या प्रवेश कार्यक्रमासाठी अनुपस्थित
#Maharashtra: Sujay Vikhe Patil joins BJP in presence of Chief Minister Devendra Fadnavis. He is son of Radhakrishna Vikhe Patil, senior Congress leader and Leader of Opposition in Maharashtra Assembly. pic.twitter.com/6Cr4eez99R
— ANI (@ANI) March 12, 2019
- सुजय विखे पाटील यांच्या पत्नीचा देखील मुख्यमंत्र्यांनी सत्कार केला
- मुख्यमंत्र्यांनी सुजय विखे पाटील यांना शुभेच्छा दिल्या
- सुजय विखे पाटील यांनी भाजपमध्ये प्रवेश केला

- प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे देखील उपस्थित
- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे वानखेडे येथील सभागृहात उपस्थित
- थोड्याच वेळात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना भेटणार असून सुजय विखे यांच्या पक्ष प्रवेशाची अधिकृत घोषणा होणार आहे
- सुजय विखेंच्या पक्ष प्रवेशाला आमदार शिवाजी कर्डीले उपस्थित
- बाळासाहेब मुरकुटे हे देखील मुंबईत दाखल झाले आहेत.
- सुजय विखेंच्या पक्ष प्रवेशाला नगर जिल्ह्यातील भाजपच्या सर्व आमदारांना या कार्यक्रमाला उपस्थित राहण्याबाबत पक्ष श्रेष्ठीकडून कळवण्यात आले आहे.






























































