महारेरा संकेतस्थळ दोन दिवस बंद राहणार

‘महारेरा’चे संकेतस्थळ शुक्रवार आणि शनिवार हे दोन दिवस बंद ठेवण्यात येणार आहे. 1 सप्टेंबरपासून महारेराचे नवीन संकेतस्थळ कार्यान्वित करण्यात येणार आहे. यासाठी जुन्या संकेतस्थळावरील सर्व माहिती नवीन संकेतस्थळावर उपलब्ध करून देणे गरजेचे आहे. ही प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी शुक्रवार आणि शनिवारी सध्याचे संकेतस्थळ बंद ठेवण्याचा निर्णय महारेराने घेतला आहे. या दोन दिवसांमध्ये विकासक, तक्रारदार, इस्टेट एजंट आणि नागरिकांना कोणतीही प्रक्रिया करता येणार नाही.