आदिवासी भागातील वीज उपकेंद्रांची ‘पॉवर’ वाढणार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मुंबई, दि. 12 (प्रतिनिधी)- राज्यातील आदिवासी विभागात  असलेल्या महावितरणच्या वीज उपपेंद्रांना आता ‘पॉवर’ मिळणार आहे. आदिवासी विभागात डोंगराळ भागात वास्तव्याला असलेल्या ग्राहकांना उच्चदाबाने वीजपुरवठा व्हावा म्हणून उपपेंद्रांची क्षमता वाढवण्याबरोबरच गडचिरोली जिह्यातील कोटला या अतिदुर्गम भागात वीज उपपेंद्र उभारण्यासाठी आदिवासी घटक कार्यक्रमांतर्गत महावितरणला दहा कोटी रुपये मिळणार असून पहिल्या टप्प्यात सहा कोटी रुपये वितरित करण्यास राज्य सरकारने मंजुरी दिली आहे.

महावितरणकडून राज्याच्या कानाकोपऱयात वीज पोहचवली जात असली तरी डोंगराळ आदिवासी भागातील ग्राहकांना कमी दाबाने विजेचा पुरवठा होतो. संबंधित ग्राहकांना योग्य दाबाने वीजपुरवठा करण्यासाठी स्थानिक वीज उपपेंद्रांची क्षमता वाढवणे आणि गरजेनुसार नवीन वीज उपपेंद्र उभारणे अवश्यक आहे. त्याची दखल घेत राज्य सरकारने आदिवासी घटक कार्यक्रमांतर्गत महावितरणला दहा कोटी रुपये देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे आदिवासी विभागातील घरगुती ग्राहक, कृषी पंपधारकांना मोठा दिलासा मिळणार आहे. दरम्यान आदिवासी घटक कार्यक्रमांतर्गत दिलेला निधी इतरत्र न वळवता वीज उपपेंद्रांसाठीच वापरला जावा, असेही सरकारने स्पष्ट केले आहे.