ममतांच्या महारॅलीत आज विरोधकांचे शक्तिप्रदर्शन

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । कोलकाता

तृणमूल काँग्रेसच्या नेत्या आणि पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी विरोधी पक्षांच्या एकजुटीचे शक्तिप्रदर्शन करण्यासाठी शनिवारी कोलकात्यात ‘महारॅली’ आयोजित केली आहे. काँग्रेसतर्फे पक्षाचे लोकसभेतील गटनेते मल्लिकार्जुन खारगे हे त्या रॅलीला उपस्थित राहणार आहेत. तसे काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी पत्राद्वारे ममता बॅनर्जी यांना कळवले आहे.

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल, कर्नाटकचे मुख्यमंत्री एच. डी. कुमारस्वामी, आंध्रचे मुख्यमंत्री एन. चंद्राबाबू नायडू, माजी पंतप्रधान एच. डी. देवेगौडा, नॅशनल कॉन्फरन्सचे नेते डॉ. फारूख अब्दुल्ला, समाजवादी पार्टीचे नेते अखिलेश यादव, राष्ट्रीय जनता दलाचे नेते तेजस्वी यादव, द्रमुकचे नेते एम. के. स्टॅलिन, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार, बसपा नेते सतीशचंद्र मिश्रा, राष्ट्रीय लोकदलाचे अध्यक्ष अजित सिंग, बंडखोर भाजप नेते, माजी केंद्रीय मंत्री यशवंत सिन्हा, अरुण शौरी, खासदार शत्रुघ्न सिन्हा, काँग्रेस नेते अभिषेक मनू सिंघवी, पटेल समाजाच्या आरक्षण आंदोलनाचे युवा नेते हार्दिक पटेल, गुजरातचे दलित नेते, आमदार जिग्नेश मेवानी, झारखंड विकास मोर्चाचे नेते बाबुलाल मरांडी आणि मंगळवारीच भाजपला रामराम ठोकलेले अरुणाचल प्रदेशचे माजी मुख्यमंत्री जिगाँग अपांग हे नेते ममता बॅनर्जी यांच्या महारॅलीला उपस्थित राहाणार आहेत.