54 लाखांच्या दागिन्यांचा अपहार करणारा गजाआड

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
प्रातिनिधीक

सामना प्रतिनिधी, मुंबई

54 लाख रुपयांच्या दागिन्यांचा अपहार केल्याप्रकरणी एकाला शनिवारी पायधुनी पोलिसांनी अटक केली. आसिफ बिलाल शेख असे त्याचे नाव आहे. त्याला न्यायालयाने 12 मार्चपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.

माझगाव येथे राहणाऱ्या तक्रारदाराचा मस्जिद बंदर येथे सोन्याच्या दागिन्यांचा कारखाना आहे. त्यांच्या कारखान्यात 25 कामगार काम करतात. जानेवारी महिन्यात त्यांना एका व्यक्तीने दागिने बनवण्यासाठी ऑर्डर दिली होती. 7 मार्चला मोती मंडल हे सलीम शेख ऊर्फ अल्ताफसोबत दागिने देण्यास गेले होते तेव्हा तेथे अन्वर नावाच्या व्यक्तीने बसण्यास सांगितले. त्यांच्याकडील दागिने घेतल्यावर कार्यालयाला बाहेरून कडी लावून ते दोघे पळून गेले होते तेव्हा त्यांनी खिडकीच्या काचा फोडून लोकांना मदतीसाठी बोलावले.

मदतीकरिता आलेल्या रहिवाशांनी त्या दोघांना बाहेर काढले. त्या दोघांनी घडल्या प्रकारची माहिती पायधुनी पोलिसांना दिली. पोलिसांनी गुन्हा नोंद करून आसिफला अटक केली तर चारजणांचा पोलीस शोध घेत आहेत.