रेस्क्यू टीममुळे कोल्ह्याच्या पाच नवजात पिल्लांना मिळाले जीवदान

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

उसाच्या शेतात आढळलेल्या कोल्ह्याच्या पाच पिल्लांना मंचर वनक्षेत्र परिसरातील रेस्क्यू टीममुळे कोल्ह्याच्या पाच नवजात पिल्लांना जीवदान मिळाले. ही घटना आंबेगाव तालुक्यातील लाखणगाव येथे घडली आहे.

लाखणगाव येथील पाचर्णे वस्ती येथे रामदास दगडू शेजवळ यांच्या शेतात भिमाशंकर सहकारी साखर कारखान्याची ऊस तोडणी चालू असताना ऊसात कोल्ह्याची पाच नवजात पिल्ले ऊस तोडणी कामगारांना आढळून आली होती. लाखणगाव येथील रेस्क्यु टिम विजय कानसकर, दत्तात्रय राजगुरव यांनी मंचर वनपरिक्षेत्र अधिकारी स्मिता राजहंस आणि वनरक्षक साईमाला गिते यांना माहिती दिली. लाखणगाव येथे घटना स्थळी टीम पोहचली. स्मिता राजहंस यांच्या मार्गदर्शनाखाली वनरक्षक साईमाला गिते रेस्क्यु टिम सदस्य दत्तात्रय राजगुरव शिंगवे व विजय कानसकर वन कर्मचारी जाधव यांनी साईटवर प्रथम पिलांना प्लास्टिक घमेल्यात पाचटाचे आच्छादन करून त्यात पिल्ले सावलीत सुरक्षीत ठेवली . एकुण पाच पिले होती. ऊस तोडणी कामगार बाजूला गेल्यावर पाच पैकी एक पिलू कोल्ह्याच्या मादीने सुरक्षित ठिकाणी घेऊन गेली. उरलेली चार पिले त्याच ठिकाणी कॅमेरा ट्रॅप लावून ठेवली. पिलांचे डोळेही उघडले नव्हते. सर्व जण त्या ठिकाणाहून दूर अंतरावर जाऊन लक्ष ठेऊन होतो, पण संध्याकाळ पर्यंत कोल्ह्याची मादी तिकडे फिरकली नाही. संध्याकाळी सात नंतर कोल्ह्याची मादी पिल्लांना शोधत आली व एक एक करत सर्व पिलांना सूरक्षीत ठिकाणी घेऊन गेली, दुसऱ्या दिवशी सकाळी कॅमेरा रेकॉर्डिंग पाहिले असता सर्व पिले सुरक्षीत रित्या आई घेऊन गेल्याचे कॅमेऱ्यात रेकॉर्ड झाले.