तडीपार कारवाई न करण्यासाठी लाचेची मागणी, मानखुर्द पोलीस ठाण्यातील निरीक्षकाविरोधात गुन्हा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
bribe-taking
प्रातिनिधिक फोटो

तडीपार कारवाई न करण्यासाठी दोन लाखांची लाच मागून त्यापैकी काही रक्कम स्वीकारून उर्वरित रकमेची मागणी केल्या प्रकरणात मानखुर्द पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक किशोर खरात (47) यांच्या विरोधात ऍण्टी करप्शन ब्युरोच्या पथकाने गुन्हा दाखल केला आहे.

समर (नाव बदललेले) याच्या विरोधात मानखुर्द पोलीस ठाण्यात एक गुन्हा दाखल असून त्या गुह्यात तडीपार कारवाई न करण्याकरिता किशोर खरात यांनी त्याच्याकडे दोन लाखांची मागणी केली होती. त्यापैकी 25 हजार खरात यांनी घेऊन उर्वरित रकमेसाठी समरच्या मागे तगादा लावला होता, पण लाच द्यायची नसल्याने समर याने ऍण्टी करप्शन ब्युरोकडे खरात यांच्या विरोधात तक्रार केली होती. त्या तक्रारीची पडताळणी केली असता खरात यांनी तडजोडीअंती 50 हजार रुपयांची मागणी करून ती रक्कम स्वीकारल्याचे कबूल केल्याने ऍण्टी करप्शन ब्युरोने पोलीस निरीक्षक किशोर खरात यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.