Maratha reservation – हुबेहुब मनोज जरांगे-पाटलांसारखे दिसणारे हनुमंत मोरेही बसले आमरण उपोषणाला

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मराठा आरक्षणासाठी गेल्या सहा दिवसापासून मनोज जरांगे-पाटील हे आंतरवाली सराटी या ठिकाणी आमरण उपोषणाला बसले आहेत. त्यांना पाठिंबा म्हणून जरांगे पाटलांसारखे हुबेहूब दिसणाऱ्या भुतवडा येथील हनुमंत मोरे यांनी देखील गुरुवारपासून जामखेड तहसील कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू केले आहे.

मराठा आरक्षणासंदर्भात राज्य सरकारने काढलेल्या अधिसूचनेचे कायद्यात रूपांतर व्हावे या मागणीसाठी मनोज जरांगे-पाटील 10 फेब्रुवारी 2024 पासून आमरण उपोषणास बसले आहेत. सध्या त्यांची प्रकृती चिंताजनक आहे, मात्र याची सरकारने कसलीही दखल घेतली नाही. त्यामुळे त्यांना पाठिंबा म्हणून आता हुबेहूब मनोज जरांगे पाटलांसारखे दिसणारे जामखेड तालुक्यातील भुतवडा गावचे तरुण हनुमंत मोरे हे देखील आमरण उपोषणाला बसले आहेत.

हनुमंत मोरे यांच्या उपोषणास जामखेड शहरातील मुस्लिम समाजाच्या वतीने देखील पाठिंबा देण्यात आला आहे. एकीकडे मनोज जरांगे पाटील हे गेल्या सहा दिवसापासून आमरण उपोषण करत आहेत. तर दुसरीकडे जरांगे पाटील यांना पाठिंबा म्हणून महाराष्ट्र बंदची हाक देण्यात आली होती. त्याच पार्श्वभूमीवर गुरुवारपासुन हनुमंत मोरे हे जामखेडच्या तहसील कार्यालयासमोर आमरण उपोषणास बसले आहेत. याबाबत कालच हनुमंत मोरे व मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने जामखेडचे तहसीलदार गणेश माळी यांना निवेदन देण्यात आले होते.