
मारुती सुझुकी एक लाख 81 हजार गाडय़ा परत मागवणार आहे. मारुती सुझुकी इंडिया लिमिटेडने शुक्रवारी यासंदर्भात घोषणा केली. सियाझ, एर्टिगा, विटारा ब्रेझा, एस-क्रॉस आणि एक्सएल 6 च्या काही पेट्रोल व्हेरिएंट्स परत मागवणार आहे.
या सर्व मॉडेल्सच्या गाडय़ा 4 मे 2018 ते 27 ऑक्टोबर 2020 या कालावधीत तयार केलेल्या आहेत. या मॉडेल्सच्या 1 लाख 81 हजार 754 युनिट्समध्ये संभाव्य त्रुटींची तपासणी केली जाणार असल्याचे कंपनीने सांगितले आहे. मारुतीने जागतिक स्तरावर रिकॉल मोहीम हाती घेतली असून या सर्व गाडय़ांमध्ये सुरक्षेसंदर्भात त्रुटी असू शकतात, असेही म्हटले ग्राहकांच्या हितासाठी मारुती सुझुकीने मोटार जनरेटर युनिटची तपासणी करून मोफत रिप्लेसमेंट किंवा वाहने पूर्णपणे बदलून देण्याचा निर्णय घेतला आहे. त्रुटी असलेल्या वाहन मालकांना मारुती सुझुकीच्या अधिकृत वर्कशॉप्समधून कळवण्यात येणार आहे.




























































