
सामना ऑनलाईन । नवी दिल्ली
जागतिक बॉक्सिंग चॅम्पियनशिपमध्ये हिंदुस्थानची ‘गोल्डन गर्ल’ मेरी कोम हिने दमदार पंचेस लगावत फायनलमध्ये प्रवेश केला आहे. अनुभवी बॉक्सर मेरी कोम हिने 48 किलो वजनी गटात (लाइट फ्लाय वेट) फायनलमध्ये प्रवेश करून सहाव्या सुवर्णपदकाच्या आशा उंचावल्या आहेत. गुरुवारी झालेल्या सेमीफायनलच्या सामन्यात मेरी कोम हिने उत्तर कोरियाच्या किम हयांग मी को को हिला 5-0 असे पराभूत केले.
One step away from the sixth!
A dynamic, ferocious and a champion display from the legend @MangteC; outclasses her North Korean opponent with a unanimous 5:0 win to assure her place in the grand finale and inch closer to her sixth ! #PunchMeinHainDum #AIBA #boxing pic.twitter.com/QEn4eTsJI9
— Boxing Federation (@BFI_official) November 22, 2018
सेमीफायनलमध्ये प्रवेश करून मेरी कोम हिने याआधीच जागतिक बॉक्सिंग चॅम्पियनशिपमधील आपले वैयक्तीक सातवे पदक पक्के केले होते. सेमीफायनलमध्ये तिच्यासमोर उत्तर कोरियाची आक्रमक आणि चपळ खेळाडू किम हिचे आव्हान होते. परंतु पाच वेळा सुवर्णपदकावर नाव कोरलेल्या आणि ऑलिम्पिक पदक विजेत्या मेरी कोमसमोर तिची डाळ शिजली नाही. मेरी कोम हिने 29-28, 30-27, 30-27, 30-27, 30-27 असे अंक मिळवत 5-0 ने विजय मिळवला. यापूर्वी आशियाई चॅम्पियनशिपच्या फायनलमध्ये देखील मेरी कोम हिने उत्तर कोरियाच्या या खेळाडूला पराभवाची धूळ चारली होती.
फायनलमध्ये युक्रेनच्या खेळाडूचे आव्हान
सेमीफायनमध्ये दणदणीत विजय मिळवलेल्या मेरी कोमसमोर फायनलमध्ये युक्रेनची हन्ना ओखोटा हिचे आव्हान असणार आहे. सेमीफायनमध्ये हन्ना हिने जपानची मडोका वाडा हिला 5-0 असे पराभूत करून फायनल गाठली आहे. यापूर्वी पोलंडमध्ये झालेल्या बॉक्सिंग स्पर्धेत मेरी कोम हिने युक्रेनच्या या खेळाडूला पराभवाचा दणका दिला होता. आताही तिच्याकडून तशाच कामगिरीची देशवासीयांना अपेक्षा आहे.
I had defeated her in final of last Asian Championship in Vietnam, so I was a little alert. That time I had beaten her in a one-sided match. Every boxer learns something, whether we win or lose we analyse about our weaknesses&strengths, about defence&attacking: Boxer MC Mary Kom pic.twitter.com/SlTZb8CPyt
— ANI (@ANI) November 22, 2018



























































