
दिल्ली महापालिकेमध्ये असलेली सत्ता भाजपने गमावली आहे. आम आदमी पक्षाने बहुमताचा आकडा गाठला असून 250 जागांपैकी ‘आप’ने 134 जागा जिंकल्या आहेत. भाजपला 103 जागांवर समाधान मानावे लागले आहे. मत मोजणीला सुरुवात झाल्यानंतर या दोन पक्षांमध्ये कांटे की टक्कर पाहायला मिळाली होती. या दोघांच्या तुलनेत काँग्रेसला किरकोळ यश मिळालं असून काँग्रेसला 10 जागाच जिंकता आल्या आहेत. आम आदमी पक्षाने पहिले काँग्रेसला धक्का देत राज्याची सत्ता मिळवली होती आणि भाजपला धक्का देत दिल्ली महापालिकेचीही सत्ता मिळवली आहे.
























































