
भांडणात मध्यस्थी केल्याच्या रागातून टोळक्याने तरूणावर कोयत्याने वार करून गंभीर जखमी केले. ही घटना 4 सप्टेंबरला रात्री साडेबाराच्या सुमारास गुरूवार पेठेत घडली.
गौरव काची (वय 37, रा. गुरूवार पेठ) असे जखमी झालेल्याचे नाव आहे. या प्रकरणी खडक पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
फिर्यादी गौरव फळविक्रेते असून गुरूवार पेठेत राहायला आहेत. काही दिवसांपूर्वी त्यांनी परिसरात एका भांडणात मध्यस्थी केली होती. त्याचा राग मनामध्ये धरून टोळक्याने 4 सप्टेंबरला रात्री सव्वा बाराच्या सुमारास गौरव मित्रासोबत गप्पा मारताना गाठले.
त्यांना जीवे मारण्याच्या हेतूने कोयत्याने वार करून गंभीररित्या जखमी केले. इतर आरोपींनी स्टंपने मारहाण करून जबरी दुखापत केली. त्याशिवाय हातातील कोयता हवेत फिरवून याला कोणी मदत केली तर, खल्लास करीन अशी धमकी दिली. याप्रकरणी पोलीस उपनिरीक्षक यशपाल सूर्यवंशी तपास करीत आहेत.




























































