सुरेश हावरे यांना राज्यमंत्रीपदाचा दर्जा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । मुंबई

शिर्डीच्या श्री साईबाबा संस्थानचे अध्यक्ष सुरेश हावरे यांना राज्यमंत्रीपदाचा दर्जा देण्यात आला आहे. राज्य सरकारने यापूर्वी प्रभादेवी येथील श्री सिद्धिविनायक मंदिर व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष आदेश बांदेकर यांना असा दर्जा दिला आहे. हावरे यांना राज्यमंत्रीपदाचा दर्जा देण्याबाबतचा शासन आदेश विधी आणि न्याय विभागाने जारी केला आहे. राज्यमंत्रीपदाचा दर्जा मिळाल्याने हावरे यांना समितीच्या मुख्यालयात कार्यालय, दौऱयावर असताना शासकीय वााहन, निवास व्यवस्था, मानधन तसेच भत्ते आदी सुविधा मिळणार आहेत.